thevoiceofnews.com

महाराष्ट्र ताज्या घडामोडी
द व्हॉइस ऑफ न्यूज - निर्भीड पत्रकारिता

कापसावरील शून्य टक्के आयात शुल्काच्या शासन आदेशाची होळी!

शेअर करा :

जीवन सोनटक्के

अकोला : कापसावरील शून्य टक्के आयात शुल्काच्या शासन आदेशाची होळी करून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी आयात धोरणाचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने राज्यभर तीव्र निषेध नोंदविला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळण्याऐवजी आयातीचे दरवाजे खुले करून देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम सरकार करीत असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. रविकांत तुपकर यांच्या हाकेनुसार अकोला जिल्ह्यातील म्हैसांग आणि चोहोट्टा बाजार येथे शासन निर्णयाची होळी करून शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. आंदोलनासोबतच जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन शेतकरीविरोधी आयात धोरण मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

व्हिडीओ साठी youtube वर क्लिक करा : #https://youtu.be/uA5oDWwvCjk?si=Wj1WeNTxUSVpQYge

व्हिडीओ आणि बातमीसाठी instagrame वर क्लिक करा : #https://www.instagram.com/reel/DfXPRySSaBU/?rpxt=a3p4NHpsMDRzd2h4

बातमीसाठी facebook वर क्लिक करा : #https://www.facebook.com/share/v/19TVWKQXYV/

म्हैसांग येथे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला तालुकाध्यक्ष मंगेश गावंडे यांच्या नेतृत्वात शासन आदेशाची होळी करण्यात आली. तर चोहोट्टा बाजार येथे युवक जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खोडके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शासन निर्णय जाळून केंद्र सरकारच्या आयात धोरणाविरोधात जोरदार निषेध व्यक्त केला. चोहोट्टा बाजार येथील आंदोलनात चंद्रशेखर नरोकार, अमोल तुरक, जयवत तरोळे, महादेव लोणे, अनिल काटकर, बाजीराव मोरोदे, भास्कर मोरे, राजू फुलंब्रिकार, विक्रम ढवडी यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top