अकोला : अनुच्छेद 326 रद्द करू पाहणाऱ्या निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने आज मदनलाल धिंग्रा चौकात आंदोलन करण्यात आले. ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
इंडिया आघाडीचे मित्र पक्षात काँग्रेस सोबत शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, मनसे यांच्यासह आदी मित्र पक्षांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुच्छेद 326 नुसार देशातील प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. हा अधिकार काढून घेण्याचा घाट मुख्य निवडणूक आयोगाचे ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे प्रयत्न करीत आहे. या विरोधात इंडिया आघाडीने हे आंदोलन केले. यावेळी अनुच्छेद 326 चे वाचन करण्यात आले. यावेळी आघाडीच्या पदाधिकाऱ्यानी भजपविरोधात नारेबाजी केली.

