thevoiceofnews.com

महाराष्ट्र ताज्या घडामोडी
द व्हॉइस ऑफ न्यूज - निर्भीड पत्रकारिता

राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची भीषण धडक; दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली, चालकाला किरकोळ दुखापत..!

शेअर करा :

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर दोन भरधाव ट्रक एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीये… अमरावतीवरून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकचा मूर्तिजापूरच्या सोनोरी नजिक अचानक टायर फुटल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं… त्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला घेत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली… या अपघातात दोन्ही ट्रकचं मोठं नुकसान झालं असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही… मात्र, एका ट्रकच्या चालकाला किरकोळ दुखापत झालीये… अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती…
या अपघातामुळे अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली… अचानक टायर फुटल्याने झालेला हा अपघात वाहनांच्या वेगावर आणि महामार्गावरील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करतोय…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top