अकोला : राज्यातील सरकारमध्ये गृहयुध्द सुरू आहे. त्यामुळेच त्यांचे बगलबच्चे हे बाहेर गुंडागर्दी करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था याची पूर्ण वाट लागलेली आहे. महाराष्ट्राचे सरकार हे पांडू हवालदार चालवीत आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर केली आहे. जनाची नाही तर मनाची असेल तर महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
अकोला येथे एका कार्यक्रमात ते आले असता माध्यमांशी बोलत होते. अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत त्यांनी राज्य सरकार वर जहरी टीका केली. यावेळी ते पुढे म्हणाले, राज्यात कायद्याचे राज्य राहिले नाही. त्यामुळे या अशा घटना घडत आहे. सरकारचे हे अपयश आहे, असे ही ते म्हणाले.

