अकोला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच म्हटलं आहे की गोळीबाराला गोळीबाराने उत्तर दिलं जाईल. पूर्णेकरांच्या हत्याकांडाचे आरोपी पकडले गेले आहेत. आणि एक शिवसैनिक म्हणून सर्व त्यांच्या सोबत शिवसेना आहेत. आणि टायगर श्रॉफ च्या तिथे उपमुख्यमंत्री शिंदे गेले आणि जर आपण विचार केला तर संजय राऊत हे प्रत्येकाला सल्ले देत असतात. की यांनी इथे जायला पाहिजे तिथे जायला पाहिजे, इथे जायला नको होतं. आज जर आपण बघितलं संजय राऊत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ले देतात. संजय राऊत हे राजकीय सल्लागार जास्त वाटतात. प्रवक्ते कमी आणि त्यांच्या सल्ल्यानी ठाकरे गटाची अवस्था खूप केविलवाणी झाली आहे. आणि इतर राजकीय पक्षांनाही वाटतं की जर आपण संजय राऊतचं ऐकत गेलं तर आपली अवस्था ठाकरे गतासारखी होऊ शकते. आणि म्हणून त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही आहे, असे शिंदे सेनेचे प्रवक्ते प्रा. प्रकाश डवले यांनी म्हटले.

