जीवन सोनटक्के
अकोला : दुष्काळग्रस्त भागातील फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या वसुली संदर्भामध्ये कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वसुली सक्तीने होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान वसुली संदर्भात शासनाने मार्गदर्शन करावे याबाबत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आमदार रोहित पवार आणि जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी आमदार पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या संदर्भात सरकारशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिल.

Link Instagram :- #https://www.instagram.com/reels/audio/29310914175198987/
Link YouTube :- #https://youtu.be/sazmzMpxaPc?si=uQbHesa0-LroLIRM
Link facebook :- #https://www.facebook.com/share/v/1G6GVSseqK/
राज्यातील 226 गावांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांनी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेले आहे. हे कर्ज वसुलीचे टार्गेट कर्मचाऱ्यांना आहे. मात्र राज्य सरकारकडून फायनान्स कंपन्यांनाच वसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे कर्जाचे हप्ते वाढत आहेत. जे शेतकरी कर्ज देण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. शेतकरी कर्ज देऊ शकतात मात्र काही राजकीय पुढार्यांमुळे सर्व शेतकरी कर्ज देण्यास तयार होत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. या संदर्भामध्ये आमदार रोहित पवार यांच्याशी कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हितासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ही या कर्मचाऱ्यांना आरबीआयच्या नियमानुसार काम करण्याचे सांगितले आहे. तसेच कर्ज वसुलीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांवर सक्ती करण्यात येऊ नये, असेही सूचना दिल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांना थेट निवेदन देणार असल्याचाही इशारा दिला आहे.

