thevoiceofnews.com

महाराष्ट्र ताज्या घडामोडी
द व्हॉइस ऑफ न्यूज - निर्भीड पत्रकारिता

पातूरच्या महिलांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू; जिल्हा परिषदेच्या ‘एक महिन्याच्या मुदती’च्या पत्रावर संताप

शेअर करा :

अकोला : अकोल्याच्या पातूर तालुक्यातील गुरुवार पेठ येथील कमलाबाई कढोणे यांच्यासह महिलांनी गेल्या दोन वर्षांपासून विविध आंदोलने आणि उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप करत अकोला जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायत शिर्ला येथील कथित बनावट दाखले, ठराव आणि बांधकाम परवानगी प्रकरणात संबंधितांवर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने उपोषण मागे घेऊन प्रशासनाला एक महिन्याची मुदत देण्याची विनंती करणारे पत्र दिले. मात्र, उपोषणकर्त्यांनी हे पत्र स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी लावलेल्या फलकावरच पत्र स्टेपलरने चिकटवले. या प्रकारामुळे महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. चौकशी पूर्ण करून दोष सिद्ध झाल्यास नियमानुसार कारवाई करण्याचे प्रशासनाने पत्रात नमूद केले आहे. न्याय निळे पर्यंत उपोषण सोडणार नाही आत्मदहन करण्याचा विचार आहे किंवा झाले तर संबंधित जबाबदार धरण्यात येईल.

बाईट : उषा आमले, महिला उपोषणकर्ते पातूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top