thevoiceofnews.com

महाराष्ट्र ताज्या घडामोडी
द व्हॉइस ऑफ न्यूज - निर्भीड पत्रकारिता

58 गॅस सिलेंडरसह 9.42 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

शेअर करा :

अकोला – शहरातील दुबेवाडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून ऑटोमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचा प्रकार सुरु असल्याच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या पथकाने आज मोठी कारवाई केली आहे.

विश्वसनीय माहितीच्या आधारावर सिव्हील लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील दुबेवाडी येथे छापा टाकला असता आरोपी मनोज रमेश दीक्षित हा पंप मशिनच्या साहाय्याने घरगुती गॅस ऑटोमध्ये भरताना रंगेहाथ पकडला गेला. त्याच्यासोबत बिस्मील्ला खान रहेमान खान आणि मोहम्मद आसिफ शेख जुम्मा हे दोघे त्यांच्या ऑटोमध्ये अवैध गॅस भरून घेताना मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी 3 वाहने – महिंद्रा मालवाहू, 2 ऑटो आणि 58 घरगुती सिलेंडर, साहित्य व रोख रक्कम 9,42,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top