अकोला : अकोल्यातील बाळापूर मधील माजी आमदार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते नातेकोदिन खतीब यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीने धारदार हत्यार घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाळापुर शहरातील माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्यावर हातात कोयता घेऊन शिवीगाळ करत जिवे मारायचा प्रयत्न केल्यामुळे बाळापुरात एकच खळबळ उडाली आहे.. हल्ला करणारा व्यक्ती नेमका कोण याबाबत अस्पष्ट असले तरी ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.. दरम्यान याची माहिती खतीब यांनी बाळापूर पोलिसांना दिली असून पोलिस सदर व्यक्तीचा शोध घेत आहेत.. मात्र या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


