thevoiceofnews.com

महाराष्ट्र ताज्या घडामोडी
द व्हॉइस ऑफ न्यूज - निर्भीड पत्रकारिता

जोपर्यंत आम्हाला एक लाख रुपये मिळत नाही : आमदार नितीन देशमुख

शेअर करा :

शिवसेना ठाकरे गटाचे वाशीम जिल्ह्यातील वनोजा समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांसोबत आंदोलन

जीवन सोनटक्के

अकोला : शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करून काही मदत दिली नाही. शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देऊन त्यांची दिवाळी साजरी होणार नाही. आम्ही आज जे आंदोलन करणार आहोत त्यात 10 हजार पेक्षा जास्त शेतकरी हजर राहणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना एक लाख रुपये देणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज दिली.


शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पाच ही जिल्ह्यातील नेते व शिवसैनिक तसेच शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहे. हे आंदोलन वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथील समृद्धी महामार्ग येथे होत आहे. त्यानिमित्ताने ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, समृद्धी महामार्गावर जे आंदोलन होईल ते भूतो न भविष्यति असं असेल. एवढे शेतकरी कधीच रस्त्यावर उतरले नाही, तेवढे शेतकरी आज विदर्भातले त्या ठिकाणी उतरतील.
आम्ही काय कोणाच्या विरोधात रस्त्यावर उतरत नाही आहोत, आम्ही आमच्या हक्कासाठी उतरत आहोत. शेतकऱ्याची संध्याकाळची चूल पेटत नाही, शेतकऱ्याच्या घरात दिवाळी साजरी होत नाही. शेतकऱ्याचं पिकाचं अतोनात नुकसान झालं, त्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय, कोणाच्या विरोधात नाही, असे त्यांनी सांगितले.

जोपर्यंत आम्हाला एक लाख रुपये मिळत नाही. तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार. विम्याचे पैसे आतापर्यंत मिळाले नाहीत. पहिला हप्ता गेला, दुसरा गेला, चौथा गेला, पीक कापणी प्रयोग झाला, तरी शेतकऱ्याला एक रुपयासुद्धा विम्याचा मिळाला नाही. आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत. आमचा खरीप हंगाम गेला, रब्बी जाईल, पण शासनाने काय मदत दिली? पाच हजार रुपये? काय होतं पाच हजार रुपयात?, असा सवाल ही आमदार देशमुख यांनी केला.

व्हिडिओसाठी ही लिंक पहा :- instagram लिंक  https://www.instagram.com/reel/DfG-Ujrt8yT/?xtok=MWE0dGt4ZmpyNTE4Zg==

YouTube लिंक :-  https://youtu.be/eVKcslJKcrA?si=v_jbx3B_GHj8H8_5

Facebook लिंक :- https://www.facebook.com/share/v/18f34bG8iT/

शेतकऱ्याची दिवाळी साजरी करा म्हणतात. जोपर्यंत शेतकऱ्याला एक लाख रुपये देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार. आम्ही पोलिसांना माहिती दिली होती की आम्ही असं असं आंदोलन करणार आहोत. भविष्यात आम्ही तसं आंदोलन करू, कल्पना देणार नाही. आम्हाला गुन्हे दाखल होण्याची, केसेसची भीती वाटत नाही. शेवटी पोलिसांनी त्यांचं कर्तव्य करावं, असेही आमदार देशमुख म्हणाले. 

आमची एवढीच विनंती आहे की पोलीस हा सुद्धा शेतकऱ्याचा पोरगा आहे. जेव्हा पोलीस हे करत असताना त्यांनी आत्मचिंतन करावं की माझाही बाप शेतकरी आहे. मी हक्कासाठी तिथं… माझा बाप तिथं आपल्या हक्कासाठी आला आहे. आणि काही दिवसांनी कालांतराने असं होईल की पोलिसांना सुद्धा सरकारच्या विरोधात जुन्या पेन्शनसाठी रस्त्यावर उतरावं लागेल. तुमचंही भविष्य बघा, तुम्ही भविष्य कसं या सरकारमध्ये… उद्या रिटायर झाल्यावर आपल्याला काय, आपला परिवार कसा चालेल हे बघा. पोलीस काही करणार नाहीत, पोलीस आंदोलनात आमच्या सोबत राहतील, असेही आमदार नितीन देशमुख म्हणाले.

बाईट – नितीन देशमुख
आमदार, शिवसेना ठाकरे गट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top