राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे अकोला आरटीओ ठरले प्रथम
अकोला : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि अपघात टळावेत म्हणून अकोला आरटीओ सतत प्रयत्नशील राहून वाहन चालकांसाठी नेहमी जनजागृतीचे कार्य करते. मोटर अधिनियम अंतर्गत शासनाने हे कायदेशीर नियम तयार केले आहे. परंतु, विविध कारणांमुळे अनेकदा या नियमांचे उल्लंघन वाहन चालकांकडून केले जाते.
वाहतूक नियम मोडण्याचे मुख्य कारण म्हणजे वेगमर्यादा ओलांडणे, उशीर झाल्यामुळे किंवा वेगाच्या आनंदासाठी वाहनचालक निर्धारित वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवतात, ज्यामुळे गंभीर अपघात होतात. लाल दिवा ओलांडणे , घाईघाईत किंवा सिग्नल बदलण्याच्या वेळी वाहनचालक लाल दिवा न थांबताच पुढे जातात, ज्यामुळे चौकात वाहनांची टक्कर होण्याचा धोका वाढतो. मद्यपान करून वाहन चालवणे , दारू किंवा अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटतो, निर्णयक्षमता मंदावते आणि भीषण दुर्घटना घडतात. हेल्मेट किंवा सीटबेल्ट न वापरणे, दुचाकीस्वार सुरक्षेची पर्वा न करता विना-हेल्मेट प्रवास करतात किंवा चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावत नाहीत, ज्यामुळे अपघातात जीवितास गंभीर धोका निर्माण होतो.

वाहतूक नियमांचे पालन करणे हे स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकावर प्रतिबंध घालण्यासाठी अकोला आरटीओने ड्रोन द्वारे कारवाईचा इशारा दिला आहे, राज्यात आधुनिक तंत्रज्ञान चा वापर करणारे अकोला आरटीओ हे प्रथम ठरले आहे.
आरटीओ रवींद्र भुयार यांच्या संकल्पनेतून ड्रोन द्वारे कारवाईचे हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मोटर वाहन निरीक्षक राष्ट्रीय महामार्गावर व शहरात हा उपक्रम राबवणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या वाहनावर मोटर मोटर वाहन निरीक्षक द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन द्वारे , नियम मोडणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मोटर वाहन निरीक्षक अनिरुद्ध देवधर, मोटर वाहन निरीक्षक संदीप तायडे, मोटर वाहन निरीक्षक सुरेश शिंदे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विनोद जाधव यांनी सांगितले, राष्ट्रीय महामार्गावर ड्रोन द्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर कारवाई करणारे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे अकोला आरटीओ प्रथम ठरला आहे असा उपक्रम राज्यात कोणत्याही आरटीओ कार्यालयाने राबविला नाही हे विशेष, ड्रोन द्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवणारे अकोला आरटीओ प्रथम ठरले आहे.


