thevoiceofnews.com

महाराष्ट्र ताज्या घडामोडी
द व्हॉइस ऑफ न्यूज - निर्भीड पत्रकारिता

अकोला रेल्वे स्थानकावर खळबळ..कोळशाच्या मालगाडीत आढळला जळालेल्या अवस्थेतील मृतदेह

शेअर करा :

जीवन सोनटक्के

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या कोळशाच्या मालगाडीत एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या या मालगाडीची तपासणी सुरू असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारणही स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top