अकोला : मुंबई येथे सुरू असलेल्या सिजेपीच्या आंदोलनाबाबत शिंदे सेना गटाचे नेते प्रा. प्रकाश डवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज सीजीपीचे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये राजकीय पक्ष सहभागी होत आहेत या पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजायला नको तसेच त्यांच्या पाठीमागे युवक नाहीत का आणि त्यांच्याकडे काही मुद्दे नाही का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय.

