thevoiceofnews.com

महाराष्ट्र ताज्या घडामोडी
द व्हॉइस ऑफ न्यूज - निर्भीड पत्रकारिता

अखिल भारतीय थल सैनिक कॅम्पमध्ये पलक चलिगंजेवारची चमकदार कामगिरी | All India Thal Sainik Camp

शेअर करा :

All India Thal Sainik Camp :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, अकोलाची एनसीसी कॅडेट पलक चलिगंजेवार हिने नवी दिल्ली येथे आयोजित प्रतिष्ठित अखिल भारतीय थल सैनिक कॅम्प (एआयटीएससी) २०२६ मध्ये यश संपादन केले. राष्ट्रीय स्तरावरील या कॅम्पमध्ये तिने ‘जेडीएफएस’ (अंतर मापन व मैदानी संकेत) या आव्हानात्मक प्रकारात महाराष्ट्र संचालनालयाचे प्रतिनिधित्व केले. तिच्या या कामगिरीबद्दल कृषी महाविद्यालयात विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

All India Thal Sainik Camp

नवी दिल्लीत महाराष्ट्र संचालनालयाचे प्रतिनिधित्व; कृषी महाविद्यालयात विशेष सत्कार

 

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, अकोलाची एनसीसी कॅडेट पलक चलिगंजेवार हिने नवी दिल्ली येथे आयोजित प्रतिष्ठित अखिल भारतीय थल सैनिक कॅम्प (एआयटीएससी) २०२६ मध्ये यश संपादन केले. राष्ट्रीय स्तरावरील या कॅम्पमध्ये तिने ‘जेडीएफएस’ (अंतर मापन व मैदानी संकेत) या आव्हानात्मक प्रकारात महाराष्ट्र संचालनालयाचे प्रतिनिधित्व केले. तिच्या या कामगिरीबद्दल कृषी महाविद्यालयात विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भोयार होते. अंतिम निवडीपूर्वी पलकला तब्बल ३ महिन्यांत ८ वेगवेगळ्या स्तरांवरील कठीण निवड शिबिरांना सामोरे जावे लागले. या कालावधीत तिने आंतरगट स्पर्धेत (आयजीसी) उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या यशाच्या जोरावर तिची अखिल भारतीय थल सैनिक कॅम्पसाठी निवड झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीश जेऊघाले यांनी केले, तर आभार डॉ. प्रेरणा चिकटे यांनी मानले. सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी व एनसीसी तुकडीने विशेष परिश्रम घेतले.

शिस्त, चिकाटी आणि नेतृत्वाची शिकवण

या संपूर्ण प्रवासातून शिस्त, चिकाटी, सांघिक भावना, आत्मविश्वास आणि खंबीर नेतृत्वगुण शिकायला मिळाल्याची भावना पलक हिने व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय भोयार यांनी पलकच्या यशाचे कौतुक करत ही कामगिरी कृषी महाविद्यालयासह अकोला शहरासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top